जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव बँकेस पुरस्कार

जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव 1933 पासुन ग्राहकाच्या सेवेत कार्यरत असुन बँकेस 92 वर्षाची परंपरा आहे.बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटक एकुण 30 शाखा कार्यरत आहेत. बँकेने 31 मार्च 2025 अखेर 3145 कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेचे भाग भांडवल 79.68 कोटी ठेवी 1874.68 कोटी, कर्ज 1270.11 कोटी व गुंतवणुक 1096.63 कोटी, नेट एन.पी.ए. 0 टक्के व नफा 45.07 कोटी झालेला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने एक पाथदर्शी धोरण समोर ठेवुन वाटचाल केल्यामुळे बँकेच्या प्रगतीत लक्षणीय वाढ झालेली आहे.

दिनांक 8 व 9 मे 2025 रोजी क्रेस्ट इन्फोमिडीया यांच्या वतीने 9 वी ऑल इंडीया अर्बन को ऑपरेटीव्ह बँकींग सर्वोच्च परिषद 2025 हॉटेल सहारा मुंबई येथे आयोजित केलेली होती. सदर शिखर परिषदेस देश भरातील बज्याच सहकारी बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मोठया संख्येने उपस्थित होते. सदरील परिषदेमध्ये जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव यांना सन 2025 सालचा नेट इटरेस्ट इनकम विभागातील पुरस्कार 9 व्या ऑल इंडीया अर्बन को ऑपरेटीव्ह बँकींग सर्वोच्च परिषद 2025 च्या वतीने दि. 9 मे 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेच्या वतीन बँकचे चेअरमन मा.वसंतराव नागदे, संचालक अशिष मोदाणी, तानाजी चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके आदी उपस्थित होते.